नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका नांदेड
जाहिर सूचना
याद्वारे सर्व
जनतेस कळविण्यात येते की, ई-गव्हर्नन्स अंतर्गत नांदेड वाघाळा शहर
महानगरपालिकेमध्ये तक्रार निवार प्रणाली
(Complaint
And Redressal Management System-CARE)
सुरु
करण्यात आली आहे. सदर आज्ञावलीमध्ये महापालिके मार्फत पुरविण्यात
येणा-या मुलभूत सुविधा विषयक विभाग निहाय तक्रारी निश्चित करण्यात
आल्या आहेत. त्यानुसार सध्या प्रायोगीक तत्वावर आरोग्य सेवा,
जन्म-मृत्यू नोंदणी विषयक व सामान्य तक्रारी स्विकारुन त्या
तक्रारी सदर आज्ञावलीद्वारे निकाली काढून महापालिका प्रशासनात
पारदर्शकता आणण्याचा महापालिकेचा मानस आहे.
करीता महापालिकेतर्फे नव्याने सुरु करण्यात आलेल्या तक्रार निवारण
प्रणालीमध्ये आरोग्य सेवा, जन्म- मृत्यू नोंदणी विषयक तक्रारी व
सामान्य तक्रारी पैकी कांही तक्रारी असल्यास नागरीकांनी आपल्या
तक्रारी, तक्रार निवारण कक्ष (एक खिडकी योजना कक्ष, मुख्य कार्यालय,
स्टेडियम परिसर, नांदेड.) येथे नोंदवाव्यात.