उद्दान विभाग

 

नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका क्षेत्रा अंतर्गत शहर सौंदर्यकरण पर्यावरण संतुलनात उद्दान विभगाची भुमीका अग्रगण् असून शहराच्या सुंदरतेत वाढ करणे तसेच शहराचे पर्यावरण सुदृढ राखण्यासाठी उद्दान विभाग प्रयत्नशिल आहे.

Visit Garden...

उद्दान विभागाची रचनाः

            महानगरपालिके अंतर्गत उद्दान विभगाचा कामकाजाची रचना खालील प्रमाणे आहे.

उद्दान अधिक्षकः- श्री डि. एम. टाकळीकर.

उद्दान पर्यवेक्षकः- उद्दान पर्यवेक्षक अंतर्गत माळी, माळण, चौकीदार, वाहन चालक  . कर्मचारी                             कार्यरत असतात.

कार्यालयीन कर्मचारीः- वरीष् लिपीक, कनिष् लिपीक, शिपाई . कर्मचारी वर्ग  कार्यरत                                      असतात.

उद्दान विभागाचे कार्यः-

1. अस्तित्वातील उद्दानाची देखभाल सरंक्षण.

2. निविन उद्दाने विकसीत करणे.

3. रस्त्यांच्या दुतर्फा तसेच रस्ता दुभाजकातील वृक्ष लागवडीची देखभाल सरंक्षण

   तसेच नव्याने विकसीत होत असलेल्या रस्त्यांच्या दुतर्फा वृक्ष लागवड करणे.

4. शहरातील पर्यावरणाचा समोतल राखण्याच्या दृष्टीने तौलनिक अभ्यास करुन

   पर्यावरण सद्दःस्थिती वार्षीक अहवाल तयार करणे.

5. वृक्ष गणना.

6. थोर राष्ट्रपुरुषांच्या पुतळयाची परीसराची देखभाल सरंक्षण करणे.

7. शहर सौदर्यकरणां अतंर्गत वाहतुक बेट विकसीत करणे.

8. महानगरपालिका रोप वाटीके अतंर्गत विविध प्रजातींचे रोप तयार करणे.

9. उद्दानातील कचयापासुन गांढूळ खत निर्मीती करणे.

 

शहरातील उद्दानक्षेत्र उद्दानेः-

            शहर सौदर्यकरणात भर घालणारी शहरात एकुण (4) मोठया उद्दानासह (10) लघू उद्दाने अस्तित्वात असुन त्याचे एकुण क्षेत्रफळ 1,33,185 चौ. मी. आहे.

 

शहरात अस्त्वित्वात असलेली उद्दानेः-

माता गुजरीजी विसावा उद्दान.

2. सिडको मध्यवर्ती उद्दान.

3. चौफाळा उद्दान.

4. नाना नानी पार्क.

5. राम बगीचा उद्दान.

6. वृंदावन कॉलनी उद्दान.

7. डॉ. बाबासाहेब अंबेडकर उद्दान.

8. छत्रपती शिवाजी महाराज पुतळा उद्दान.

9. महात्मा गांधी पुतळा उद्दान.

10.जुना मोंढा टॉवर उद्दान.

11. श्री गुरुगोबिंदसिंघजी वस्तुसंग्रालय उद्दान.

12. सन्मीत्रा कॉलनी उद्दान.

13. हुतात्मा स्मारक उद्दान.

14. अण्णाभाऊ साठे चौक उद्दान.

वरील पैकी मजा गुजरीजी विसावा उद्दान शहरातील सर्वात मोठे उद्दान असून उद्दानातील प्राचिन संस्कृतीवर अधारीत ट्रि हाऊस डायनासोर पार्क विकसीत करण्यात आले असून या सोबत उद्दानात फॅमली ट्रेन, मिनी ट्रेन, आकर्षक कारंजे, शोभीवंत फूल, झाडे, लाहन मुलांसाठी खेळणी साहित् इत्यादी बाबी आहेत. सदर उद्दानापासून महानगरपालिकेस सालसन 2008-09 या सालात रु 12, 20, 988.00 तसेच सालसन 2009-10 या वर्षात नोव्हेंबर 2009 अखेर पर्यंत 11,05,576.00 रु उत्तन् प्राप् झाले आहे.

  शहरात नव्याने (06) लघू उद्दान निर्मीतीची कार्यवाही प्रस्तावित असुन शहरातील हिरवळीचे क्षेत्रा वाढविण्याच्या दृष्टीने उद्दान विभागाचे प्रयत् आहेत.

वृक्ष लागवडः-

            पर्यावरणाचे महत् लक्षात घेता शहरातील अस्तित्वात असलेल्या वृक्षाची गणना करून आवश्यक वृक्ष लागवडीची उद्दष् पुर्ती करण्याच्या दृष्टीने महानगरपालिकेने स्वतःची रोपवाटीका काबरानगर जलशुध्दीकरण केंद्र येथे विकसीत केली असुन त्याद्वारे विविध प्रजातींची साधारणतः 25000 रोपे तयार केली असून शहरात नव्याने विकसीत होत असलेल्या रस्त्यांचा दुतर्फा रस्ता दुभाजकांत सदर झाडे लावण्यात येत आहेत यानुसार शहरातील 15 कि. मी. रस्ता दुभाजकात शोभीवंत फुल झाडांची लागवड करण्यात आली आहे तसेच नागरीकांना मोफत झाडे उपलब् करुन पर्यावरणाचे संवर्धन करण्यात येते.

     सन 2002-03 या वर्षातील वृक्षगणनेनुसार शहरात एकुण 101319 झाडे स्तित्वात आहेत.

पर्यावरण सद्दस्थीतीः-

            पर्यावरणाचे महत् लक्षात घेता पर्यावरणाचा वस्तुस्थीतीचा शास्त्रीय दृष्टया अभ्यास करुन शासनाच्या मार्गदर्शक तत्वानुसार महानगरपालिका क्षेत्राचा पर्यावरण सद्दःस्थीती अहवाल तयार करण्यात येत असून त्यानुसार आवश्यक उपाय योजना करुन सुदृढ पर्यावरण मुक् शहर निर्मीतीसाठी प्रयत् करण्यात येत आहेत.

शहर सौदर्यकरणः-

            नांदेड वाघाळा शहरास असलेल्या एतीहासीक पार्श्वभुमीचा विचार करता शहरात मोठया प्रमाणावर भाविक भेट देत असल्यामुळे शहर सौदर्यकरणासाठी विभागातर्फे विविध चौक पुतळा परीसरांचा सुशोभिकरणाचे काम प्रगतीपथावर असून शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, डॉ. बाबासाहेब अंबेडकर पुतळा, महात्मा गांधी पुतळा, आण्णाभाऊसाठे पुतळा परीसराचे सुशोभीकरणाचे काम पुर्ण करण्यात आले असुन शहरातील महात्मा ज्योतीबा फुले, महाराणा प्रतापसिंह पुतळा उभारणीचे परिसराच्या सुशोभीकरणाचे काम प्रगतीपथावर आहे.

            शहरातील जुनामोंढा येथील टॉवर सुशोभीकरणाचे तसेच इतर (10) चौकांच्या सुशोभीकरणाचे काम महापालिकेने हाती घेतले असून यापुढे शहरातील सौदर्यात वाढ होणार आहे.

Visit Garden...