डॉ.राम मनोहर लोहिया वाचनालय व ग्रंथालय
नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका, नांदेड
नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या माताहत एकूण 9 वाचानालय व 1 स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन केंद्र व डॉ.बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिका अस्तित्वात आहे. विविध वाचनालयापैकी होळी, रहमतनगर, मिल कॉर्नर वाचनालय हे भाड्याच्या जागेवर घेऊन चालविण्यात येतात. उर्वरित विविध वाचनालय व अध्ययन कक्ष याची सुस्थिती व दुरुस्ती तसेच देखभाल इ.बाबी महानगरपालिकेद्वारे करण्यात येतात.
डॉ.राम मनोहर लोहिया वाचनालय व ग्रंथालय (मुख्य) वजिराबाद.
ग्रंथपाल - श्री पि.के.पवार
कार्यरत कर्मचारी वर्ग - लिपीक, पुस्तक वाहक, शिपाई
कामाच्या वेळा - वाचन कक्ष सकाळी 8 ते 10 व सायंकाळी 5 ते रात्री 9
पुस्तकांची संख्या -
1. मराठी, हिंदी, व इंग्रजी संख्या - 57990
2. उर्दू पुस्तकांची संख्या - 05292
वाचनकक्षात येणा-या वृत्तपत्राची संख्या -
1. मराठी- 23
2. हिंदी - 07
3. इंग्रजी- 08
4. ऊर्दू - 12
5. तेलगू- 02
नियतकालीके
1. मराठी 15
2. हिन्दी - 30
3. इंग्रजी - 35
4. ऊर्दू - 04
ग्रंथालय सभासद
स्थाई सभासद - 337
अस्थाई सभासद - 5833
एकुण सभासद - 6170
ग्रंथालय संगणकीकरण -
महापालिका ग्रंथालय आधुनिककरण करण्याच्या कार्यवाही अंतर्गत प्रथम टप्यात मुख्य ग्रंथालय संगणकीकरण करण्याची कार्यवाही प्रगतीपथावर आहे.
डॉ.राम मनोहर लोहिया ग्रंथालयाचे सभासद होताना अनामत रक्कम रुपये 200/- प्रवेश फी 10/- मासीक वर्गणी रुपये 20/- आकारण्यात येते. ग्रंथालय विभागात ग्रंथालय सभासदांकरीता सन 1986 मध्ये मासीक विभाग सुरु करण्यात आलेले असुन या मध्ये विविध भाषेतील जवळपास 80 ते 90 मासीके उपलब्ध करुन देण्यात येतात. मासीकांची वर्गणी दर महा रु.30/- आकारण्यात येते दर वर्षी सर्व वाचनालयात वाचकांसाठी दिवाळी अंक उपलब्ध करुन देण्यात येतात.
डॉ. राम मनोहर लोहिया वाचनालय अंतर्गत चालविण्यात येणा-या स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन केंद्रात प्रवेश घेण्याकरीता रु.100/- प्रवेश फी व मासीक वर्गणी रु. 50/- आकारण्यात येते.
मुख्य ग्रंथालयातील सभासद होण्याकरीता अटी व नियम
1) सभासंदानी सभासद होतांना अनामत रक्कम रु.200/- प्रवेश फी रु.10/- पुस्तकांची मासीक वर्गणी रु.20/- नियतकालीकांची मासीक वर्गणी रु.30/- भरल्यास एका वेळी दोन पुस्तके दोन मासीके मिळू शकेल.
2) सभासदास मासीग वर्गणी पुस्तके व मासिके न घेतले तरी भरावी लागेल.
3) अ) वर्गणी दरमहा 5 तारखेपर्यंत जमा करावी लागेल.
ब) उपरोक्त तारखेपर्यंत वगर्णी जामा न केल्यास पुस्तके/ मासीके बदलून मिळणार नाहीत.
क) सतत तीन महिने वर्गणी न भरल्यास पुर्व सुचीत न करता सभासदत्व रद्द करुन अनामत रक्कम जप्त करण्यात येईल.
-
महिन्या कोणत्याही तारखेस सभासदत्व सुरु केल्यास त्या महिन्याची पुर्ण वर्गण द्यावी लागेल.
-
सभासदत्व एक वर्षापुरतेच मर्यादीत राहील. दरवर्षी (एप्रील मध्ये सभासदत्वाचे नुतणीकरण करणे आवश्यक आहे.
-
सभासदत्व (कारण न सांगता देखील) नाकारण्याचा/ रद्द करण्याचा अधिकार राखून ठेवलेला आहे.
-
पुस्तके (7) दिवसात व मासिके (3) दिवसात परत केले पाहिजेत.
-
पुस्तके/ मासिके मुद्दतीत परत न केलयास मुदतीनंतर विलंब शुल्क दर दिवसास रु.0.50 पैसे प्रमाणे आकारण्यात येईल. राजपत्रीत अधिकारी वर्गाशिवाय शासकीय निमशासकीय/ मंडळे/महामंडळे विशेष शासन मान्य संस्था/ महानगरपालिका येथील पदाधिकारी/ कायम स्वरुपी द्वितीय, तृतीय श्रेणीत कर्मचारी वर्ग यांनी घेतलेली हमी ग्रंथपाल यांनी प्रमाणित केल्यास अधिकृत राहील या बाबतचे अधिकार ग्रंथपाल यांना राहील.
6) पुस्तके अधिक दिवसासाठी हवे असल्यास पुस्तके ग्रंथालयात आणून पुन्हा नोदवून घ्यावे. परंतु पुर्ननोंदणीचे अधिकार ग्रंथपाल यांना राहील.
7) विलंब शुल्क देणे न झाल्यास पुस्तके / मासिके मिळणार नाहीत.
8) सभासदानी लेखी अर्ज दिल्यास सभासदत्व चालु आर्थिक वर्ष एप्रिल ते मार्च या काळात जास्ती-जास्त दोन महिने स्थगित ठेवता येईल, स्थगीत काळाची वर्गणी आकारली जाणार नाही.
9) सभासदत्व रद् करावयाचे असल्यास अनामत रक्कमेच्या मुळ पावतीसह लेखी अर्ज करावा पावती शिवाय अर्जाचा विचार केला जाणार नाही.
10) सभासद रद् करण्यापुर्वी पुस्तके/ मासिके यांची पुर्ण वर्गणी, विलंब शुल्क प्रथम जमा करावे लागेल.
11) एखादे विवक्षीत पुस्तक, संदर्भग्रंथ वाचनालयाबाहेर दिले जाणार नाही. ती वाचनालयात वाचावयास मिळतील.
12) पुस्तके/ मासिके हरवल्यास त्याची दीडपट किमंत भरावी लागेल किमंत न भरल्यास अनामत रक्कम जप्त करुन उर्वरित रक्कम वसुलीसाठी कायरेशीर कार्यवाही (महानगरपालिका अधिनियमान्वये) करण्यात येईल.
13) पुस्तके/ मासिके घेतांना मुळातच ते फाटके व खराब असल्यास ते घेतेवेळस ग्रंथपालाच्या निर्दशनास आणून द्यावे व पुस्तकार स्वाक्षरी घ्यावी. नसता फाटण्याची जबाबदारी सभासदावर राहील. या बद्दल दीडपट किमंत वसुल केली जाईल.
14) कुठलीही पुर्वसूचना न देता नियमात फेरबदल, वाढ, दुरुस्ती करण्याचे अधिकार राखून ठेवले आहेत व अशा सुधारित नियमाची प्रत वाचनालयात लावण्यात येईल व ते सर्व सभासदास बंधनकारक राहतील.
15) पुस्तकाची देवाण- घेवान सायंकाळी 5.00 ते रात्री 8.30 पर्यंत केली जाईल.
16) ग्रंथालय दर सोमवारी व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी बंद राहील.
17) अनामत रक्कम लेखाविभागातून कार्यालयीन सुट्टी खेरीज सकाळी 11.00 ते दुपारी 2.00 वाजेपर्यंत घेता येईल.
18) ग्रंथालयातील सभासदांना कमीत-कमी सहा महिने आपले सभासदत्व रद्द करता येणार नाही.
स्पर्धापरिक्षा मार्गदर्शन केंद्र
आजच्या स्पर्धात्मक युगात आणि प्रगतिशील जीवनात स्पर्धात्मक विषयाचे अभ्यास आवश्यक आहे. प्रशासनाच्या क्षेत्रात आपल्या जिल्ह्याचे विद्यार्थी स्पर्धात्मक परिक्षेत यश संपादन करुन नव्या जिवनाला सन्मुख करण्यासाठी प्रथम टप्यात नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका, डॉ.राम मनोहर लोहिया वाचनालय, मुख्य वाचनालय व ग्रंथालय अंतर्गत स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन केंद्र दिनांक 1 नोव्हेंबर 2006 पासुन सुरु करण्यात आले आहे. तसेच इंटरनेट तंत्रज्ञानामुळे जगभरातील महिती कशीही, कुठेही आणि कधीही उपलब्ध होण्याची सोय झालेली असल्यामुळे तसेच इंटरनेट हे शैक्षणीक प्रगतीचे अत्युत्तम साधन असल्यामुळे त्याचा विविध प्रकारांनी उपयोग करुन घेण्यासाठी इंटरनेट सेवा ही र्स्पधा परिक्षा मार्गदर्श केंद्रात उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
या केद्रांत स्पर्धात्मक परिक्षेच्या विद्यार्थ्यांना विशेष उपयोगाची विविध स्पर्धात्मक, योजना विषयक मासीके उपलब्ध करुन देण्यात आली आहेत. त्यामध्ये केंद्र व राज्य लोकसेवा आयोगाच्या मुख्य परिक्षा तदवतच सेट-नेट परीक्षांकरीता उपयुक्त अशी, बँकांसाठी होणा-या निवड परिक्षा महाराष्ट्र प्रज्ञा शोध परिक्षा, राष्ट्रीय प्रज्ञा शोध परिक्षा, फौजदारी परिक्षा इत्यादीसाठी लागणारे वाचन साहित्य आहे.
कार्यरत कर्मचारी वर्ग-2 लिपीक
वेळ- सकाळी 8 ते रात्री 9
पुस्तकांची संख्या - 2292
.बाबासाहेब आंबेडकर अभ्यासीका (शिवाजीनगर)
द्वितीय टप्यात शिवाजीनगर येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर अभ्यासीका सन 2007 मध्ये स्थापित करण्यात आलेले असून सदरील अभ्यासीकेत डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या साहित्या व्यतिरिक्त स्पर्धात्मक परिक्षेच्या विद्यार्थ्यांना विशेष उपयोगाची असेल अशी एकुण 2024 पुस्तके उपलब्ध करुन देण्यात आलेली आहेत. सदर अभ्यासिकेचे सुशोभिकरण व वातानुकूलीकरण करण्याचे काम हाती घेण्यात आलेले आहे.
शहरातील वाचनालय
|
अ.क्र. |
वाचनालय -शाखा |
पत्ता |
|
01 |
डॉ.राम मनोहर लोहिया वाचनालय |
अशोकनगर |
|
02 |
डॉ.राम मनोहर लोहिया वाचनालय |
हुतात्मा स्मारक गोकुळनगर, नांदेड. |
|
03 |
डॉ.राम मनोहर लोहिया वाचनालय |
होळी |
|
04 |
डॉ.राम मनोहर लोहिया वाचनालय |
जनता बाजार, शिवाजीनगर |
|
05 |
डॉ.राम मनोहर लोहिया वाचनालय |
रहमतनगर |
|
06 |
डॉ.राम मनोहर लोहिया वाचनालय |
मिलकॉर्नर |
|
07 |
डॉ.राम मनोहर लोहिया वाचनालय |
सिडको |
|
08 |
डॉ.राम मनोहर लोहिया वाचनालय सदरील ग्रंथालयाचे नुतनीकरण करण्याचे काम हाती घेण्यात आले असुन पुढील वर्षापर्यंत वाचनकक्ष व ग्रंथालय विभाग पूर्ववत सुरु करण्यात येईल. |
गणेशनगर |


