1. मालमत्‍ता कर कोणत्‍या मालमत्‍तेस लागतो ? [Hide Answer]

मालमत्‍ता कर हा मुंबई प्रांतीक महानगरपालिका अधिनियम 1949 कलम 127 अ अन्‍वये शहरातील ईमारती व जमिनी यांना लागु आहे.

 2. मालमत्‍ता कर आकारणी करण्‍यासाठी कोणती कागदपत्रे आवश्‍यक आहेत? [Hide Answer]

खरेदीखत / सोसायटी प्‍लॉट वाटप प्रमाणपत्र / अथवा इतर मालकी हक्‍काचे कागदपत्र.

 3. नवीन घर क्रमांक घेण्‍यासाठी काय कागदपत्रे आवश्‍यक आहेत? [Hide Answer]

हस्‍तांतरण दस्‍त, प्‍लॉट वाटप प्रमाणपत्र, बांधकाम परवानगी, अकृषिक परवानगी इ. सह अर्ज दिल्‍यास मालमत्‍ता कराची आकारणी करुन आपल्‍या मालमत्‍तेची कर आकारणी नोंदवहीला नोंद घेतली जाते.

 4. कर आकारणी करण्‍यासाठी कोठे अर्ज करावा ? [Hide Answer]

महापालिकेच्‍या सर्व क्षेत्रीय कार्यालयात मालमत्‍तेच्‍या नोंदीकरीता आवश्‍यक कागदपत्रांसह अर्ज करता येईल.

 5. मालमत्‍ता कर कसे लावतात ? [Hide Answer]

मालमत्‍ता कर आकारणीसाठी घराचे बांधकामाचा प्रकार, स्‍थळ, वापर, क्षेत्रफळ यावरुन वार्षिक भाडे निश्चित केले जाते. सदर भाडे मुल्‍याच्‍या टक्‍केवारीच्‍या प्रमाणात मालमत्‍ता कर लावले जातात.
(दर पहा)

 6. करयोग्‍य मुल्‍य कसे निश्चित करण्‍यात येते ? [Hide Answer]

1. मोकळ्या भुखंडाचे कर योग्‍य मुल्‍यः भुखंडाच्‍या किंमतीच्‍या 6% रक्‍कम ही करयोग्‍य मुल्‍य समजण्‍यात येते.
2. बांधकामाचे कर योग्‍य मुल्‍यः करयोग्‍य मुल्‍य निश्चित करण्‍याकरीता तक्‍ता '' अ '' मध्‍ये दर्शविल्याप्रमाणे बांधकाम प्रकार, बांधकामासमोरील रस्‍ता रुंदी व व वापर या आधारे कर योग्‍य मुल्‍य निश्चित केले जाते.

उदा. (बांधकाम क्षेत्रफळ) X (तक्‍ता ''अ'' दर) = (दरमहा भाडे)
(दरमहा भाडे) X 12 = (वार्षीक भाडे)
(करयोग्‍य मुल्‍य) = (वार्षीक भाडे) - (वार्षीक भाड्याच्‍या 10% रखरखावटी करीता सुट)

 7. कर आकारणी यादी किती दिवसांनंतर बदलली जाते ? [Hide Answer]

मुंबई प्रांतीक महानगरपालिका अधिनियम 1949 प्रकरण 8 कलम 21(2) नुसार दर चार वर्षातुन निदान एकदा तरी नवीन कर आकारणी पुस्‍तक तयार करण्‍यात आले पाहीजे.

 8. विशेष मालमत्‍ता कर कोणत्‍या मालमत्‍तांना लागु होतो ? [Hide Answer]

विशेष मालमत्‍ता कर मोकळ्या भुखंडांना लागु होतो.

 9. मालमत्‍ता करांचे प्रकार कोणते ? [Hide Answer]

मालमत्‍ता कराचे तीन प्रकार आहेत.
1. महापालिका कर
2. राज्‍य शासन कर
3. सेवा कर

महापालिका कर राज्‍य शासन कर सेवा कर
सामान्‍य कर
मनपा शिक्षण कर
वृक्ष उप कर
पथ कर
जललाभ कर
जल निस्‍सारण कर
अग्निशमन कर
विशेष पाणी कर
विशेष स्‍वच्‍छता कर
सामान्‍य पाणी पट्टी
राज्‍य शिक्षण कर
रो. ह. यो. कर
महाराष्‍ट्र इमारत कर
(मोठ्या निवासी इमारतींसाठी)

 10. करांचे दर काय ? [Hide Answer]

कराचे दर तक्‍ता ब.

 11. कर आकारणी बाबत आक्षेप घेण्‍याची पध्‍दत काय ? [Hide Answer]

कर आकारणीच्‍या खास नोटीस वर आक्षेप नोंदविता येतो. तो नोटीस प्राप्‍त झाले पासुन विहीत नमुन्‍यात 15 दिवसाचे आंत क्षेत्रीय कार्यालय किंवा मुख्‍य कार्यालय (कर आकारणी विभाग) येथे सादर करावा. त्‍यावर रीतसर सुनावणी घेऊन आक्षेपाचा निकाल केल्‍या जातो.
(आक्षेप अर्ज नमुना रु. 5.00 भरुन प्राप्‍त करता येतो)

 12. आगाऊ भरणा केल्‍यास किती सवलत मिळते ? [Hide Answer]

माहे सप्‍टेंबर पूर्वी थकीत करासह पूर्ण वर्षभराचा कर भरणा केल्‍यास महापालिका चालू मालमत्‍ता करात 5% सुट देण्‍यात येते.

 13. पाणी पट्टी आकारणीची पध्‍दत व दर काय आहेत ? [Hide Answer]

सध्‍या महापालिका पाणी पुरवठा पाईपचे व्‍यासावर आधरीत असुन खालील दराने विशेष पाणी कर आकारण्‍यात येतो.

प्रकार

मासीक

वार्षिक

1/2'' घरगुती रु. 125 रु. 1500
1/2'' बिगर घरगुती रु. 550 रु. 6600

 14. निवासी व अनिवासी मालमत्‍ता कराचे दरात काय फरक आहे ? [Hide Answer]

निवासी मालमत्‍तेच्‍या कर योग्‍य मुल्‍य निश्चितीकरीता जे आपेक्षीत भाडे दर आहेत त्‍याच्‍या दुप्‍पट भाडे दराने भाडे निश्चित करुन करयोग्‍य मुल्‍य निश्चित करण्‍यात येते.

 15. मालमत्‍ता कराची मागणी/ वसुलीची पध्‍दती काय ? [Hide Answer]

महानगरपालिका सहामाही पध्‍दतीने कराची मागणी बिले देवून त्‍यानुसार कर वसुली करत आहे. जेणेकरुन मालमत्‍ताधारकांस त्‍यांचेकडील मालमत्‍ता कर दोन हप्‍त्‍यात भरणा करता येतो.

 16. विशेष पाणी कराची मागणी/ वसुलीची पध्‍दती काय ? [Hide Answer]

महानगर पालिका व्दिमाही पध्‍दतीने पाणी कराची मागणी बीले देऊन त्‍यानुसार कर वसुली करत अाहे. जेणेकरुन मालमत्‍ता धारकांना त्‍यांचेकडील पाणी कर सहा हाप्‍त्‍यात भरणा करता येतो.

© Nanded Waghala City Municipal Corporation, Nanded.   All rights reserved.                        Site Developed and Maintained by: Cohort Technologies Pvt. Ltd.