नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या कर विभागातर्फे आपले सहर्ष स्वागत ...
नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या प्रमुख उत्पन्न स्त्रोतापैकी दुस-या क्रमांकांचे उत्पन्न मालमत्ता करातून महापालिकेस प्राप्त होते.
सन 2005-2006 मध्ये महापालिका क्षेत्रातील मालमत्तांच्या कराची फेर कर आकारणी करण्यात आली असून ही कर आकारणी करताना मालमत्तेचे क्षेत्रफळ,
बांधकाम प्रकार, मालमत्तेसमोरील रस्त्याची रुंदी व बांधकामाचा वापर या बाबी प्रथमतः विचारात घेऊन त्या मालमत्ता सर्वसाधारण भागातील आहेत की स्लम भागातील आहेत,
यावर आधारीत भाडे दर निश्चित करुन कर आकारणी करण्यात आली आहे.
त्यानूसार नवीन अस्तित्वात येणा-याही मालमत्तांची कर अकारणी करण्यात येत आहे.
आपल्या
मालमत्तेला किती कर ?
किंवा
यापुर्वी लागलेला कर योग्य आहे किंवा नाही ?
याची पडताळणी करण्याकरीता "कर गणक" पानावरील तक्त्यामध्ये आपल्या मालमत्तेचे क्षेत्रफळ, बांधकाम वर्गवारी, वापर, रस्त्याची रुंदी व इतर अनुषंगिक माहीती भरल्यानंतर लागणारे
कराचे विवरण मिळू शकेल. हेच कर आपणांस नोटीस मध्ये लागल्याचे दिसून येतील, कर आकारणी 2005-2006 मध्ये आपण खास नोटीस वर
आक्षेप घेतला असल्यास या करातून 30% सूट मिळून कराची मागणी कमी आलेली आहे ह्याची खात्री करता येईल व आपले कर योग्य आहेत का नाहीत हे तुम्हालाच ठरविता येईल.
आपले कर योग्य नाहीत असे वाटत असल्यास, संबंधित क्षेत्रीय कार्यालयात जाऊन आपल्या मालमत्ता कर आकारणी संचिकेशी पडताळणी करता येईल. यामध्ये तफावत असेल तर, आपण ती दुरुस्ती करण्यासाठी अर्ज करु शकाल,
तसेच इतरही काही तक्रारी असल्यास आपल्या तक्रारीची दखल घेऊन शंका निरसन करण्यास प्रशासन उत्सुक आहे.
कर विवाद
निवारण : प्रत्येक महिण्याच्या 10 तारखेला सर्व क्षेत्रीय कार्यालयात केले जाते. आपल्या शंकाचे संपूर्ण समाधान होईल याची आम्हाला खात्री आहे.
नांदेड शहराचा केंद्र शासनाने जवाहरलाल नेहरु नागरी पूनरुत्थान योजनेत समावेश केला आहे.
ज्यामुळे आपल्या शहराच्या विकासाकरीता भरीव निधी प्राप्त होत आहे. या योजनेत सुधारणा कार्यक्रमाची पुर्तता करणे बंधन कारक आहे.
त्यानूसार आपण आमचे संपर्कात येऊन आपल्या कर आकारणीशी संबंधीत शंका निराकरण करुन घेण्याचे व कर भरणा करून साहय करावे असे असे आम्ही नम्र आवाहन करीत आहोत...